Balasaheb Thorat : सत्यजीत तांबे चांगल्यामतानं विजयी, त्यांचं अभिनंदन; थोरातांची पहिली प्रतिक्रिया
Balasaheb Thorat on Satyajeet Tambe: नाशिक (Nashik Padvidhar Election) पदवीधर निवडणुकील काँग्रेसच्या विरोधात जात अपक्ष निवडणूक लढवून जिंकणारे आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्याबद्दल पहिल्यांदाच माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''जे काही झालं आहे, ते फक्त पक्षीय राजकारण आहे. मी माझ्या पक्षश्रेष्ठींना याबद्दल माझं मत कळवलं आहे. सत्यजीत तांबे चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत.'' याबद्दल थोरात (Balasaheb Thorat ) यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित शिंदे शाही बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमात थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला.























