एक्स्प्लोर
Nandurbad Water Cut : उद्यापासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा, वीरचक धरणात 40 टक्के पाणीसाठा शिल्लक
ऐन पावसाळ्यात नंदुरबारकरांवर पाणीकपातीचं संकट उभं ठाकलंय. जुलैमध्ये धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे नंदुरबार नगरपालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतलाय. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात अवघा ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ऐन पावसाळ्यात वीरचक धरणाची ही स्थिती आहे. म्हणूनच भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेत नंदुरबार शहराला उद्यापासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
आणखी पाहा























