Nandurbar Bus Conductor : फुकट म्हणत आजी आजोबांना बसमधून उतरवलं,कंडक्टरचा संतापजनक प्रकार
Nandurbar Bus Conductor : फुकट म्हणत आजी आजोबांना बसमधून उतरवलं,कंडक्टरचा संतापजनक प्रकार
संतापजनक... आजी आजोबांना कंडक्टरकडून अपमानास्पद वागणूक, फुकटचे प्रवासी म्हणत बसमधून खाली उतरवलं! नंदुरबारच्या शिरपूर आगाराच्या बसमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
बस कंडक्टरचा उर्मटपणा समोर आला असून वृद्ध आजी-आजोबांना कंडक्टरने खाली उतरवल्याचा प्रकार घडलाय.
अपमानास्पद वागणूक करत बसमधून आजी-आजोबांना उतरवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
हे फुकट प्रवास करणारे आहेत, अधिकारी राहिले असते तर गोष्ट वेगळी राहिली असती, असं बस कंडक्टर बोलत असल्याचं समोर आलं आहे.
बस खराब झाल्याने दुसऱ्या शिरपूर आगाराच्या बसमध्ये वृद्ध आजी आजोबा चढत असताना हा प्रकार घडला.
बस कंडक्टरने केलेल्या या संतापजनक प्रकारानंतर सोशल मीडियावर बस कंडक्टर विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बस कंडक्टरवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
























