एक्स्प्लोर
Nanded Death : नांदेड शहरात तरुणाची निर्घुण हत्या,मारहाण करुन डोक्यावर 3-4 वेळा बाईक घातली
नांदेड शहरात शुक्रवारी पहाटे क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. व्यंकटेश वल्लमवार असं मृत तरुणाचं नाव आहे. नांदेडच्या शिवाजी नगर परिसरात नागार्जुन हॉटेल आहे. त्याच्या बाहेर एक पानटपरी आहे. तितं व्यंकटेश काम करायचा. शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमाराला व्यंकटेश हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी गेला. त्याच वेळी तिथं आलेल्या दोन तरुणांसोबत त्याचा वाद झाला. या दोघांनी त्यांच्या मित्रांना फोन करून बोलावलं, आणि व्यंकटेशला जबर मारहाण केली. एका आरोपीनं तर त्याच्या डोक्यावरून तीन ते चार वेळा दुचाकी घातली. यामुळे व्यंकटेशचा जागीच मृत्यू झाला. आठ आरोपीना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















