WEB EXCLUSIVE : हॉरर फिल्मच्या वास्तूचे रुग्णालयात रुपांतर; डॉक्टर पिनाक धंदेंच्या जिद्दीची कहाणी
शहराच्या मधोमध, पण झाडे झुडपे, साप विंचू ह्यांचे वास्तव्य असणारी ही वास्तू. एकेकाळी नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय नावाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून कार्यरत होती. काही कारणाने बंद पडली आणि दशक ओलांडून गेले. रुग्णांच्या जागी साप विंचू राहू लागले. वास्तूचा काही भाग पडीक वाटू लागला, फोफडे पडू लागले. वैद्यकीय उपकरणे तशीच पडून राहिली, धुळीचे थर जमत राहिले. एकंदरीत एखाद्या हॉरर फिल्मचा सेट वाटू लागला. पण मग कोविडची लाट आली. उपराजधानी नागपुरात तर खूप जोरदार. त्यात तिसऱ्या लाटेची चर्चा. कोर्टाच्या आदेशाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी उचलल्या पावलाने डॉक्टर पिनाक धंदे ह्यांनी अवघ्या 15 दिवसात ह्या हॉरर फिल्मसारख्या वास्तूला परत रुग्णालयात पालटले. हे करायला लागते ती फक्त जिद्द!























