CM DCM At Samruddhi Highway : फडणवीसांच्या हाती कारचं स्टेअरिंग, समृद्धीची 'टेस्ट राईड'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबरला होणार आहे. या समृद्धी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'टेस्ट राईड'वर निघाले आहे. नागपूरहून हा ताफा शिर्डीच्या दिशेने रवाना झाला असून एकाच कारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे कारचं 'स्टेअरिंग' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नागपूर ते शिर्डी पर्यंतचा ५२१ किमीचा प्रवास पूर्ण करणार आहेत. नियोजित दौऱ्यानुसार आज सायंकाळी पाच वाजता ते शिर्डी येथे पोहोचतील.























