GN Saibaba : नक्षलवादप्रकरणी जी.एन.साईबाबा निर्दोष, नागपूर खंडपीठाचा निर्णय
G N Saibaba : नक्षलवाद (Naxal) प्रकरणी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांना नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) मोठा दिलासा दिला आहे. जी.एन. साईबाबा यांची जन्मठेप रद्द करण्यात आली आहे. प्राध्यापक जी.एन. साईबाबा (G N Saibaba) यांनी नक्षलवाद्यांशी (Naxalite) संबंध ठेवून त्यांच्यासाठी काम करण्याचा आरोप असलेल्या आणि गडचिरोली सत्र न्यायालयाकडून झालेली जन्मठेपेची शिक्षा नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे. जीएन साईबाबांसह इतर चार आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. यामुळे नक्षलवाद प्रकरणी जी एन साईबाबांसह पाच जणांची निर्दोष सुटका झाली आहे.























