Shivsena : कथित ऑडीओ क्लिपप्रकणी रामदास कदम यांना शिवसेनेच्या दसरा मेळ्याव्यात नो एन्ट्रूी ?
शिवसैनिकांसाठी विचाराचं सोनं लुटण्याचा दिवस म्हणजे, दसरा मेळावा. पण सलग दुसऱ्या वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही. पण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा निश्चित झाली आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये 50 टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत. सामान्य शिवसैनिकांना या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित राहता येणार नाही. त्यात शिवसेना वरिष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) दसरा मेळाव्यात उपस्थित राहणार का नाही याबद्दल अनेक चर्चा आहेत.























