Akanksha Mohan Death : मॉडेल आकांक्षा मोहनच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?
मॉडेलने केली आत्महत्या, हॉटेलच्या खोलीत पंख्याला लटकलेला मृतदेह सापडला, घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. मुंबईच्या अंधेरी भागातील एका हॉटेलच्या खोलीत एका ३० वर्षीय मॉडेलने पंख्याला गळफास लावून घेतला. वर्सोवा पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मॉडेलने हॉटेलमध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या वेटरने रूमची बेल वाजवली आणि अनेक वेळा वाजवूनही रूम उघडली नाही वेटरने ही माहिती हॉटेलच्या मॅनेजरला दिली, मॅनेजरने तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली
हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पोलिसांनी मास्टर चावीने खोली उघडली आणि पाहिल्यावर लोकांची तारांबळ उडाली























