(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kalyan : वॉर्डबॉयची डुलकी, रुग्णालाच केली मारहाण, कल्याणच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील प्रकार
केडीएमसी च्या शास्त्री नगर रुग्णलयातील एका व्हायरल व्हिडियो मुळे रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पहाटेच्या सुमारास डोंबिवलीत राहणारे आनंद नवसागरे आपल्या वडिलांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना घेऊन शास्त्री नगर रुग्णलयात आले. मात्र शास्त्री नगर रुग्णालयातील इमरजन्सी विभागातील नर्स व वार्ड बॉय साखर झोपेत होते. त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, अर्धा तासाच्या खटाटोपा नंतर वॉर्ड बॉय जागा झाला तर नर्सने दरवाजा उघडला. त्यानंतर रुग्णावर उपचार करणं सोडून बिथरलेल्या वॉर्ड बॉय ने थेट आनंद यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्का बुक्की केली. रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून देखील हा वॉर्ड बॉय थांबत नव्हता. वॉडबॉय दारू पिऊन इमर्जन्सी वॉडमध्ये झोपला असताना त्याला उठवल्याने त्याने शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकाने करत बेजबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.