(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Speech | आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण
मागील काही दिवसांपूर्वी आरेतील जागा जंगल घोषित केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, आरेतील जागा जंगल घोषित केली आहे. त्यावेळी 600 एकर जागेची घोषणा केली होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून 800 एकरची व्याप्ती करण्यात आली आहे. आता मुंबईत 800 एकराचं जंगल असणार आहे. आहे ते टिकवणं आपलं काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दुसरी महत्वाची घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आरेतील प्रस्तावित कारशेड आता कांजूरमार्गला होणार. आरेत कारशेड होणार आहे की नाही याबाबत देखील महत्वाची घोषणा त्यांनी केली. आरेत कारशेड होणार कांजूरमार्गची सरकारी जमीन शून्य रुपये किमतीत देणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली. जनतेचा एकही पैसा खर्च होणार नाही. या जागेसाठी एकही रुपया खर्च केला जाणार नाही, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कांजुरची जमीन शून्य रुपये किंमतीने सरकारने दिलेली आहे. त्यावर आता मेट्रो कारशेड उभे राहणार आहे. आरे जंगलात साधारण 100 कोटींचा खर्च करून एक बिल्डींग उभारली आहे. ते पैसे वाया जाणार नाहीत. बिल्डींग अन्य कारणासाठी वापरणार आहोत. एकही पैसा वाया जाऊ देणार नाही, असं ते म्हणाले.