Uddhav Thackeray Arvind Kejriwal PC : मातोश्रीवर नव्या नात्यांची घोषणा,ठाकरे-केजरीवालांची संपूर्ण PC
Thackeray-Kejriwal Press Conference : "अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली आहे," अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तर "जनतेला जागं करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत," असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मातोश्रीवर (Matoshree) जाऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते.























