(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 90: सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 31 May 2024 : ABP Majha
मुंबईत मध्य रेल्वेवर महामेगाब्लॉक, गाड्या उशिराने, प्रवाशांचे हाल, प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी
राज्यात पाणीटंचाईचं भीषण संकट...अहमदनगरमध्ये गावांना ५ दिवसांनी पाणीपुरवठा तर भंडाऱ्यात तलाव कोरडे पडल्यानं वन्यप्राण्यांचे हाल
आचारसंहिता शिथील करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचा नकार, नवी लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता शिथील होणार नाही, आयोगाने फेटाळली सरकारची विनंती
बंगळुरुच्या गुलाबी कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क केंद्राने हटवले, महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यात शुल्क देखील हटवण्याची मागणी
मुंबईवर पाणीसंकट, पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ ८ टक्के साठा, ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल घेतले, तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू, अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुनेही तपासणार
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंटना दणका देणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर
विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीत घराचा स्लॅब कोसळून दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू, दुर्घटनेला फेडरेशन आणि म्हाडा जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप.
राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली, ६ जुलैऐवजी २१ जुलैला परीक्षा घेण्यात येणार.. कुणबी नोंदींचा लाभ घेता यावा म्हणून परीक्षा पुढे ढकलली.
कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातला मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णाला अटक, जर्मनीतून परतल्यावर तातडीने बंगळुरू विमानतळावर अटक, आज कोर्टात हजर करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारीच्या भगवती अम्मन मंदिरात घेतलं दर्शन, विवेकानंद स्मारकावर १ जूनपर्यंत ध्यानधारणा करणार