Thane ते Diva स्टेशन दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गाचे PM Modi यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन
मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्टेशन दरम्यानच्या पाचव्या- सहाव्या रेल्वेमार्गाचे उद्घाटन 18 फेब्रुवारीला होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन हे उद्घाटन होईल, या नवीन मार्गामुळे मध्य रेल्वे मार्गावर ३६ लोकल वाढणार हेत. यात 34 वातानुकूलित आणि दोन साध्या लोकलचा समावेश असेल अशी माहिती रेल्वेतर्फे देण्यात आलेय. दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेची काही किरकोळ कामं बाकी असल्यानं मध्य रेल्वेवर आणखी काही पाच मेगाब्लॉक घेण्यात येणार अशल्याचं मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आलंय. हे मेगाब्लॉक आठ ते बारा तासांपर्यंत असणार आहेत. मात्र जलद लोकल, मेल आणि एक्स्प्रेससाठी वेगळी मार्गिका उपलब्ध अशल्यानंत रेल्वेच्या वेळापत्रकारव मेगाब्लॉकचा फारसा परिणाम होणार नाही.






















