Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष
Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी 18 व्या लोकसभेचा (18th Lok Sabha) कार्यकाळ सुरु होत असताना संसदेच्या अधिवेशनापूर्वी माध्यमांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस गौरवशाली असल्याचं म्हटलं. आजचा दिवस वैभवाचा आहे. स्वातंत्र्यानंतर आपण स्वत: बांधलेल्या नव्या संसदेत खासदारांचा शपथविधी सोहळा करत आहोत. आतापर्यंत ही प्रक्रिया जुन्या संसद भवनात होत होती, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
आजच्या महत्त्वाच्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांचं मनापासून स्वागत करत आहेत. संसदेची ही निर्मिती भारताच्या सामान्य माणसांच्या संकल्पांच्या पूर्ततेसाठी करण्यात आली आहे. नवा उत्साह, नव्या गतीसह नवी उंची प्राप्त करण्याची ही संधी आहे. 2047 पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीचं ध्येय घेत 18 व्या लोकसभेची सुरुवात होत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. जगातील सर्वात मोठी निवडणूक शानदार पद्धतीनं पार पडली. गौरवशाली पद्धतीनं ही निवडणूक पार पडली. भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. 65 कोटी मतदारांनी मतदानात भाग घेतला, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.