Narendra Modi : मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर मोदींची सभा पार पडणार
मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज मोदींची सभा पार पडणार आहे. यावेळी मोदी काय भाषण करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय... मोदींच्या या सभेसाठी २५० हून अधिक बस बूक कऱण्यात आल्यात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह इतरही अनेक भागांतून एसटी बस मुंबईत दाखल होतील. मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्तानं भाजप आणि शिंदे गटाकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीये... मुंबईतील अनेक भागांतील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.महत्वाची बाब म्हणजे आज घाटकोपर-वर्सोवा मेट्रो पावणे सहा ते साडेसात या वेळेत बंद राहणार आहे... दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ज्या ठिकाणी होणारेय, त्या बीकेसी मैदानावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी बीकेसी मैदानाची पाहणी केलीय आणि अधिकाऱ्यांचा सुरक्षेबाबत सूचनाही दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते जमायला सुरूवातही झालीय.