(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MNS Member Registration Campaign : 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक', मनसेचं नवं घोषवाक्य
MNS News Latest Updates : मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या (MNS on Hindutva and Marathi) मुद्यावर आक्रमक झालेली राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे आता 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक' ही घोषणा देणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु होणार असून पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी या मोहिमेला सुरुवात होणार आहे. 2014 पासून मनसेच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लागलाय. त्यानंतर मनसेनं मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला. आता मनसेच्या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्वाच्या मुद्याची जोड दिल्यानं मनसेची पुढची राजकीय भूमिका आता स्पष्ट झाली आहे. या मुद्यावर मनसेला पुन्हा सूर गवसणार का याची उत्सुकता आहे.