एक्स्प्लोर

‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'

अवघ्या 18 लाखांत तयार झालेल्या या सिनेमाने 5- 6 कोट्यवधींची कमाई करत बॉलिवूडला धक्का दिला.

Sadhana Singh on Sachin Pilgaonkar: आजच्या सिनेमांत अ‍ॅक्शन, हिंसा आणि गोंगाट असलेले वाढताना दिसत  असले तरी कधीकाळी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहता येतील असे साधे, भावनिक चित्रपटही बनायचे. 1982 साली प्रदर्शित झालेला ‘नदिया के पार’ हा अशाच काळाची आठवण करून देणारा चित्रपट. तब्बल 43 वर्षांनंतरही ‘गुंजा- चंदन’ ही जोडी प्रेक्षकांच्या मनात आजही तितकीच जिवंत आहे. या सिनेमातील गुंजाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री साधना सिंग यांनी अलीकडेच एका मुलाखतीत शूटिंगच्या दिवसांमधील काही न बोललेल्या गोष्टी उघड केल्या आहेत. 

सचिनसोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या...

अभिनेत्री साधना सिंग यांनी नदिया के पार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सचिन सोबत असलेल्या बॉण्ड विषयी सांगितलं. त्या म्हणाल्या," नदिया के पार फिल्म करण्यापूर्वी सचिन पिळगावकरांसोबत एकदा भेट झाली होती. मी तेव्हा मुंबई फिरायला आले होते. एक मैफिल होती. आम्ही गाणी वगैरे गायली. नंतर जेव्हा नदिया के पार च शूटिंग सुरू झालं तेव्हा सचिनला माहित नव्हतं हिरोईन कोण आहे. जेव्हा सचिनने निर्मातांना विचारलं की चित्रपटात हीरोइन कोण आहे तेव्हा त्यांनी माझा फोटो दाखवला. सचिनने लगेच ओळखलं. की ही साधना आहे. मी हिला खूप चांगलं ओळखतो. जेव्हा नदिया के पार चलो शूटिंग सुरू झालं तेव्हा मी सचिनसोबत खूप कम्फर्टेबल होते. एकमेकांची टांग खेचणं, मस्करी करणे हे तर सुरूच होतं. पण शूटिंग दरम्यान आम्ही यार झालो. आमच्यातील बॉण्ड बघून अनेक लोक आमच्यात अफेअर सुरू असल्याचे बोलत होते. पण नाही. पण जशी कुठल्याही दोन मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये मैत्री असते तशीच निखळ मैत्री आमच्यात होती. 

त्या पुढे सांगतात की, या अफवांमुळे आणि एका तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे ही मैत्री हळूहळू दुरावली. “आज भेट झाली तर आम्ही प्रेमानं बोलतो, पण पूर्वीसारखी जवळीक आता राहिलेली नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘नदिया के पार’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी

‘नदिया के पार’ हा चित्रपट कमी बजेट असूनही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. अवघ्या 18 लाखांत तयार झालेल्या या सिनेमाने 5- 6 कोट्यवधींची कमाई करत बॉलिवूडला धक्का दिला. आजही या चित्रपटाला IMDb वर मिळालेलं रेटिंग या सिनेमाच्या लोकप्रियतेची साक्ष देतं. ‘कौन दिशा में लेके चला रे बटोहिया’ आणि ‘जोगी जी धीरे धीरे’ यांसारखी गाणी आजही लग्नसमारंभात आणि प्रवासात ऐकली जातात. याच कथेवर पुढे ‘हम आपके हैं कौन’सारखा सुपरहिट चित्रपट तयार झाला, हे विशेष. चार दशकांनंतरही ‘नदिया के पार’ आणि त्यातील कलाकारांची आठवण प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे, हेच या चित्रपटाचं खरं यश म्हणावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget