एक्स्प्लोर

Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?

हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार रविवार, 11 जानेवारी 2026 रोजी राज्यातील वातावरणात बदल होणार आहे.

Maharashtra weather Update: उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये सध्या थंडीची लाट कायम आहे. राजधानी दिल्लीत या हिवाळ्यातील आतापर्यंतची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून, काश्मीर खोऱ्यात काही ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेलाय. त्यामुळे नागरिक कडाक्याचा गारठा अनुभवत आहेत. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात मोठे बदल होणार आहेत. महाराष्ट्रावर नेमका कसा परिणाम होणार, पाहूया

हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार रविवार, 11 जानेवारी 2026 रोजी राज्यातील वातावरणात बदल होणार आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील हवामान घडामोडींचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवत असून, विविध भागांमध्ये हवामानात चढउतार जाणवू शकतो. 

राज्यात हवामान बदलणार ? 

उत्तर भारतात थंडीचा जोर वाढलेला असला, तरी महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामानामुळे तापमानात किंचित वाढ होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय नसल्यामुळे राज्यात अपेक्षित अशी शीतलहर अद्याप दाखल झालेली नाही. मुंबईत सकाळी हलकी थंडी जाणवत असली, तरी संपूर्ण जानेवारी महिन्यात गारठ्याचे वातावरण कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ढगाळ वातावरणामुळे थंडी ओसरणार

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार ढगाळ वातावरणामुळे आज राज्यातील काही भागांत थंडीचा कडाका कमी होऊ शकतो. काही ठिकाणी धुके आणि दव पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश महाराष्ट्रात तापमानात चढउतार होण्याची शक्यता आहे.

कोकण - मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काय स्थिती?

सुट्टीचा दिवस असल्याने फिरायला जाणाऱ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे. कोकण-गोवा किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगांनी व्यापलेलं राहण्याचा अंदाज आहे. श्रीलंकेजवळ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेत ओलावा वाढला असून, त्यामुळे अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. 

जरी पावसाची शक्यता नसली तरी ढगाळ वातावरणामुळे दिवसा जाणवणाऱ्या उष्णतेत किंचित घट होऊ शकते. परिणामी, काही भागांमध्ये दिवसाही कडाक्याच्या थंडीची शक्यता आहे. 

धुळे सर्वात थंड, किमान तापमान 8.5 अंश

राज्यात सध्या धुळे येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअस इतके आहे. जळगावमध्ये 9.2 अंश, तर भंडारा येथे 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत गारठ्याची जाणीव अधिक होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
KDMC Election 2026 BJP Vs Shivsena: डोंबिवलीत शिवसेना-भाजप राडा, पोलिसांनी रात्री शिंदे गटाच्या दोन नगरसेवकांना उचललं, हायव्होल्टेज ड्रामा
डोंबिवलीत मध्यरात्री हायव्होल्टेज राडा, शिवसेनेच्या उमेदवारांना पोलिसांनी हॉस्पिटलमधून उचललं, नेमकं काय घडलं?
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
Embed widget