Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
BMC Election : परळमधील शिवसेनेच्या शाखेत राज ठाकरे पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना बोलण्याची विनंती केली. त्यावेळी शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात या असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

मुंबई : एकीकडे महायुतीच्या नेत्यांचा जाहीर सभेकडे कौल असताना दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मात्र जास्तीत जास्त शाखांना भेटी देण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचे सुपूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मनसे आणि शिवसेनेच्या अनेक शाखांना भेटी दिल्या. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारल्याचं दिसून येतंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी मनसे आणि ठाकरे सेनेच्या मुंबईतील विविध शाखांना भेटी दिल्या. परळमधील शिवसेना शाखेत राज ठाकरे पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना बोलण्याची विनंती केली. त्यावेळी उद्या शिवतीर्थावर या... इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाकू असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं.
Amit Thackeray Borivali Visit अमित ठाकरेंची शाखांना भेट
मुंबईच्या बोरिवली विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार स्वाती बोरकर यांच्या शाखेला मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली भेट. यावेळी बोरिवलीमध्ये शिवसैनिकांकडून मोठ्या उत्साहात अमित ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेला अमित ठाकरेंनी भेट दिल्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली. यावेळी शिवसेना-मनसेच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन अमित ठाकरे यांनी केलं.
Thackeray Brothers Mumbai Sabha : ठाकरेंची मुंबईतील पहिली संयुक्त सभा
ठाकरे बंधूंची तोफ रविवारी मुंबईत धडकणार आहे. तर सोमवारी ठाकरे बंधूंची ठाण्यात सभा होणार आहे. रविवारी ठाकरेंची संयुक्त सभा शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या सभेत ठाकरे बंधू मुंबईकरांना काय संदेश देणार आणि युतीमधील नेत्यांच्या टीकेला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, सोमवारी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. गडकरी रंगायतन चौक येथे ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी,
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 10, 2026
मुंबई लुटू पाहणाऱ्यांना तडीपार करण्यासाठी,
मुंबई रक्षणाची शिवगर्जना करण्यासाठी,
शिवशक्ती एकवटणार!
ठाकरे येताहेत...
स्थळ - शिवतीर्थ, दादर.
रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी
वेळ - सायंकाळी ६.०० वाजता pic.twitter.com/b7GH1Edb1W
Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार
एकीकडे ठाकरे बंधूंची तोफ मुंबईत धडाडणार आहे, तर दुसरीकडे महायुतीचा मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. रविारी वांद्र्यातील एमसीएममध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती हा जाहीरनामाा प्रसिद्ध केला जाणार आहे.
ही बातमी वाचा :




















