एक्स्प्लोर

मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!

मुंबईतील एबीपी माझाच्या महिला पत्रकाराचे वडील महेश भालेराव यांना 8 जानेवारी रोजी मसिना हॉस्पिटल ट्रस्टमध्ये ॲडमिट करण्यात आले होते.

मुंबई : रुग्णालये (Hospital) म्हणजे सर्वसामान्यांना छळणारा, लुटणारा पांढरपेशी गुन्हेगारांचा अड्डाच बनलाय अशी संतप्त ओरड नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने होत असते. सरकारकडून लाखोंच्या रुग्णसेवा मोफत दिल्या जाण्याच्या घोषणा होतात, पण अंमलबजावणी मात्र शून्य असते. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका आमदाराच्या पी.ए.च्या पत्नीचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणातून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील (Mumbai) मसिना हॉस्पिटल या धर्मादाय नोंदणीकृत रुग्णालयाने माणुसकीला काळिमा फासण्याचं काम केलंय. एका महिला पत्रकाराच्या वडिलांचे निधन झाले असता पैसा आणि प्रोसेस अभावी तब्बल 8 तास रुग्णालय प्रशासनाने मृतदेह अडवून ठेवल्याची संतापजनक घटना घडली. त्यामुळे, संवेदनाहीन ट्रस्टच्या नावाखाली भ्रष्ट बनलेल्या रुग्णालयात पुन्हा एकदा माणुसकी मेल्याचं प्रदर्शन झालं. याप्रकरणी, तीव्र संतापानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. 

मुंबईतील एबीपी माझाच्या महिला पत्रकाराचे वडील महेश भालेराव यांना 8 जानेवारी रोजी मसिना हॉस्पिटल ट्रस्टमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान 10 जानेवारीला पहाटे 3.30 वाजता त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाने आधीच दु:खात असलेल्या भालेराव कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम मसिना रुग्णालयाने केलंय. कारण, पैसे आणि डॉक्युमेंट प्रोसेसच्या नावाखाली हे रुग्णालय तब्बल 8 तास मृतदेह देण्यास नकार देत राहिले. याबाबत सातत्याने विनंती करुनही रुग्णालयाने मृतदेह देण्यास नकार दिला. त्यामुळे, रुग्णालयाच्या ट्रस्टी कविता पै. यांना भेटण्याच्या विनंती केली, पण त्यांनीही भेट दिली नाही. 

वडिलांच्या जाण्याच्या अचानक बसलेल्या धक्क्यातून घरी कर्ता पुरुष नसल्याने महिला पत्रकार एकट्याच सगळी प्रोसेस करत होत्या. तरीही रुग्णालयाने माणुसकी न दाखवता इकडून तिकडे फेऱ्या मारायला लावल्या. वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी वाट पाहावी लागली ही संतापजनक घटना घटना आहे. आमदाराच्या पीएवर, एखाद्या पत्रकारावर अशी वेळ येत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर, केवळ माध्यमांत बातम्या आल्यानंतरच आमदार, खासदार, मंत्री आणि सरकार लक्ष देणार का? संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा रुग्णालयांवर वचक नाही का, ते काय करतात? असा सवाल यानिमित्ताने पुढे आला आहे.  

महिला पत्रकाराची चॅरिटी कमिश्नरकडे तक्रार

विशेष म्हणजे, पेशंटला रुग्णालयात दाखल केल्यानंतर 9 जानेवारीच्या रात्री 10 वाजता आधी 3 लाख भरा तरंच ऑपरेशन होईल, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार, आपले वडिल लवकर बरे व्हावेत म्हणून कुटुंबीयांनी काही पैसे भरलेही, पण माणूस हातचा गेला आणि कुटुंबाची हेळसांड झाली हे सहन करण्यासारखे नाही, असे म्हणत महिला पत्रकाराने मुख्यमंत्री कार्यालय आणि चॅरिटी कमिशनर, मुंबई यांच्याकडे घडल्या प्रकाराबाबत तक्रारही नोंदवली आहे. मात्र, मुर्दांड झालेल्या रुग्णालय प्रशासनाला कुठेतरी जरब बसवणे गरजेचं आहे, अन्यथा सरकारच्या घोषणांवरुनही सर्वसामान्यांचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Goverment On Student Protest: महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Embed widget