Maharashtra Unlock : Mumbai Local बाबात मुख्यमंत्री कोणता 'सिग्नल' देणार?
मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती लोकलप्रवासाची...तर संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती राज्य सरकार निर्बंध शिथिल कधी करणार याची.. आणि या दोन्हींबाबात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ग्रीन सिग्नल दिलाय. आता निर्णयाचा चेंडू हा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे.. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या सूचना आरोग्य विभागानं दिल्या आहेत. मात्र निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या १४ जिल्हयांत निर्बंध शिथिल करण्याबाबत आज मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत बैठक आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.























