एक्स्प्लोर
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance PC मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. मुंबईचा महापौर मराठी होणार आणि आमचाच होणार, असंही राज ठाकरे म्हणाले. तर महाराष्ट्राच्या रक्षणसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितले. आज (24 डिसेंबर) मुंबईत एकत्र पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युतीची घोषणा केली. (Shivsena UBT MNS Yuti)
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे- (Raj Thackeray-Uddhav Thackeray Yuti)
- मराठी माणसाने बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे. कारण आम्ही आज दोघे इथे बसलेलो आहोत ठाकरे बंधू आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाच सेनापती मधले एक सेनापती, त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरेंचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांत ठाकरे, अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता. त्याच्या नंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही, उद्धव ठाकरे म्हणाले.
- मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उधावर्ती लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.
- इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे पाहायला मिळताय, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
- दिल्लीत बसलेल्यांचे मनसुबे अनेक आहे. आता आपण भांडत राहिलो, तर त्यांना फायदा होईल. मी मागे म्हटलं, तसं एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
- तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस कोणाच्या वाट्याला जात नाही आणि कुणी त्याच्या वाट्याला आलं तर त्याला सोडत नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
- राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. आज शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे मी जाहीर करतो, असं राज ठाकरे म्हणाले.
- कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोण किती जागा लढवणार , हे आता सांगणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
- दोन टोळ्या वाढल्या आहेत, जे राजकीय पक्षातील मुले पळवतात. राज्यात सध्या दोन लहान मुलं पळवण्याची टोळी आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
- ज्याची प्रतीक्षा होती ती शिवसेना आणि मनसेची युती झाली हे मी जाहीर करतो, असं राज ठाकरे म्हणाले.
- मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा विश्वासहा राज ठाकरेंनी व्यक्त केला.
- शरद पवार यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. ही महाराष्ट्र प्रेमीची युती आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement





















