BMC Election 2026: मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
Raj Thackeray and Uddhav Thackeray alliance: बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेनेच्या (उबाठा) युतीची घोषणा केली. या दोघांनी वरळीतील एका हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईचा महापौर मराठी व्यक्तीच होणार आणि तो आमचाच असेल, असे ठणकावून सांगितले. मात्र, या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी मुंबई किंवा अन्य महानगरपालिकांच्या जागावाटपाचे सूत्र जाहीर केले नाही. परंतु, या पत्रकार परिषदेपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले. 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी शिवसेना-मनसेला (Shivsena MNS Alliance) किती जागांवर विजय मिळू शकतात, याबाबताच अंदाज वर्तवला. तसेच आपल्याला या निवडणुकीत उमेदवारी मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. मी 100 टक्के माझ्या वॉर्डातून लढणार आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. त्यामुळे किशोरी पेडणेकर या शिवसेना-मनसे युतीच्या पहिल्या उमेदवार ठरु शकतात.
मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत किशोरी पेडणकेर या दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर झाल्या होत्या. परंतु, यंदा ठाकरे गटाने ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी धोक्यात असल्याचेही सांगितले जात होते. मात्र, राज-उद्धव यांच्या युतीच्या घोषणेपूर्वी किशोरी पेडणेकर यांनी आपले तिकीट फिक्स असल्याचा दावा केला. मी स्वत: रणंगणात असेन. ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 130 पेक्षा अधिक जागा जिंकतील, असा दावाही किशोरी पेडणेकर यांनी केला. भाजपवाले आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी आमच्यावर कधी आरोप केले नाहीत. आता ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आम्ही काय काम केलं, हे मुंबईकरांना माहिती आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
शिवसेना ठाकरे गट - 140 ते 150 जागांवर निवडणूक लढवणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष -60 ते 70 जागांवर निवडणूक लढवणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीसोबत आल्यास फॉर्मुला नेमका काय असणार?
शिवसेना ठाकरे गट - 130 ते 140 जागांवर निवडणूक लढवणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष 60 ते 70 जागांवर निवडणूक लढवणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 15 ते 20 जागा शिवसेना ठाकरे गटातील कोट्यातून सोडणार
आणखी वाचा
























