Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?
Raj Thackeray Video: जेव्हापासून राज आणि उद्धव यांची युती होणार याबाबत बोलणी सुरु झाली तेव्हापासून त्यांची जुनी विधाने तसेच व्हिडिओ सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.

Raj Thackeray Video: गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. आज युतीची औपचारिक घोषणा करताना राज आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष होतं. यावेळी बोलताना राज यांनी सुद्धा अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये भाजपला सूचक इशारा दिला. जेव्हापासून राज आणि उद्धव यांची युती होणार याबाबत बोलणी सुरु झाली तेव्हापासून त्यांची जुनी विधाने तसेच व्हिडिओ सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी सुद्धा अत्यंत सुचक शब्दांमध्ये इशारा दिला.
माझ्याकडे सुद्धा खूप व्हिडिओ आहेत
राज ठाकरे यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांचा सुद्धा व्हिडिओ फिरत आहे. त्यामध्ये ते अल्लाहू अकबर म्हणत आहेत. त्यांनी या गोष्टी आम्हाला सांगू नयेत. माझ्याकडे सुद्धा खूप व्हिडिओ आहेत असं म्हणत राज यांनी सूचक इशारा दिला. या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. ते काय बोलतात त्याच्यावर माझे व्हिडिओ तयार असतील. तत्पूर्वी राज यांनी घोषणा करताना सांगितलं की, बरेच दिवस प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता त्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही जाहीर करत आहोत. जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज केव्हा भरायचा ते आपल्याला कळवल जाईल. ज्यांचं मुंबईवर, महाराष्ट्रावर, मराठी माणसावर प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांनी आमच्या मागे उभं राहा, असे आवाहनही त्यांनी केले.
त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही
दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले की, यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रवरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रपासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. मराठी माणसाला आवाहन करताना त्यांनी स्पष्ट केले की, आता जर का चुकाल तर संपाल. आता जर फुटाल तर पूर्णपणे संपून जाल, म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















