Mantralaya : तिजोरीत खडखडाट असताना मंत्रालयात नुतनीकरणावर उधळपट्टी; सर्वसामान्यांचा सरकारला सवाल
मंत्रालयातील दालनांच्या डागडुजीला सुरुवात, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना दालनांच्या डागडुजीवर खर्चांचा भडीमार.
एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, मंत्रालयातील दालनांच्या डागडूजीवर लाखो रुपयांची उधळण सुरु झालीय... सरकार बदललं की मंत्रालयामध्ये तोडफोडीला सुरुवात होते... आता पुन्हा एकदा मंत्रालयात नवीन दालन आणि अधिकाऱ्यांसाठी कार्यालय बनवायला सुरुवात झालीय.. त्यामुळे मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर तोडफोडीचा आवाज घुमतोय... विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी केलेली दालनही तोडून नव्याने बनवायला सुरुवात झालीय.. एवढंच नाही तर मंत्रालयातील सफाई करताना फाईलींचा मोठा ढिगाराही पाहायला मिळतोय..
तसेच लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी टीका केलीय.. राज्याची तिजोरी भरण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी, अर्थमंत्री अजित पवारांसमोर दारूच्या दुकानांचे परवाने वाढवण्यासंबंधी प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले जातंय.. आणि हाच धागा पकडून संजय राऊतांंनी सरकारवर हल्लाबोल केलाय.. लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी सरकार त्यांचे भाऊ, नवरा यांना दारूडे करण्याची योजना आखत असल्याचे म्हटलंय...