Dadar Vegetable Marketमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त, भाजी विक्रेत्यांना 6 फुटांचं अंतर ठेवण्याच्या सूचना
राज्यात आजपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी आजही बाजारपेठेत गर्दी केल्याचं चित्र आहे. परंतु दादरच्या भाजी बाजारपेठेत आज काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त बाजारपेठ परिसरात तैनात करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची कडक अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. भाजी विक्रेत्यांमध्ये सहा फुटांचं अंतर ठेवत त्यांना व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर वेळोवेळी पोलिसांकडून लाऊड स्पीकरवरुन नियमांचे पालन करण्याच्या सूचना देखील केल्या जात आहेत. एकीकडे असं जरी असलं तरी दुसरीकडे दादर स्थानकाजवळील चित्र मात्र जैसे थे बघायला मिळालं. पोलिसांच्या आवाहनानंतरही भाजी विक्रेते आणि नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे.






















