एक्स्प्लोर
Mumbai High Court Judge Dismissed | न्यायाधीशांनीच केले अमली पदार्थांचे सेवन, बडतर्फीची कारवाई
मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्त पालन समितीने इरफान शेख नावाच्या न्यायाधीशांना बडतर्फ केले आहे. पोलिसांनी जप्त केलेले अमली पदार्थ ज्यांच्या ताब्यात ठेवले जातात, त्याच न्यायाधीशांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळून आले. हा प्रकार मुंबईतील बहुचर्चित कॉर्डेलिया क्रुझ प्रकरणाशी संबंधित आहे. फिल्म स्टार आर्यन खानला एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या टीमने कॉर्डेलिया क्रूजवरुन अटक केली होती, त्यावेळी इरफान शेख हे न्यायाधीश देखील क्रूजवर होते. इरफान शेख यांनी त्यावेळी अमली पदार्थांचे सेवन केले होते. समीर वानखेडे यांच्या टीमने इरफान शेख यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना गुपचूपपणे रुग्णालयात दाखल केले, असे समोर आले आहे. उपचारादरम्यान त्यांनी कोकेन या अमली पदार्थांचे सेवन केल्याचे उघड झाले. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी इरफान शेख यांच्या चाचण्यांचे रिपोर्ट मिळवून कारवाईची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर शिस्त पालन समितीच्या चौकशीत इरफान शेख दोषी आढळले. एबीपी माझाने या प्रकरणी काही सवाल उपस्थित केले आहेत: "इरफान शेख यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते तर त्यांच्यावर इतर आरोपीप्रमाणे अटकेची कारवाई का नाही? इरफान शेख यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या समीर वानखेडे यांच्या टीमवरती कोणती कारवाई होणार?"
मुंबई
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















