Mumbai Corona : कोरोना वाढतोय ! गेल्या 14 दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या तिप्पट
गेल्या १४ दिवसांत राज्यातल्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास तिप्पट झाली आहे. राज्यात १९ मार्च रोजी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार ३०८ होती. ती रुग्णसंख्या काल दिवसभरात तीन हजार १६ वर पोहोचली. राज्यात दिवसभरात ६९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. याच कालावधीत मुंबईत १९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. मुंबईत सध्या कोरोनाचे ८४६ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाची चौथी लाट ओसरल्यानंतर राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांनी तब्बल पाच महिन्यांनी अडीच हजाराचा आकडा पुन्हा ओलांडला. राज्यात प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसून येत आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून राज्यातील कोरोनाचे ८० टक्के सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत.























