HC on Narayan Rane Bungalow : राणेंच्या बंगल्यातील बांधकामावरून कोर्टानं महापालिकेला फटकारलं
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील अधीश बंगल्यातल्या अनधिकृत बांधकामाबाबत आता नरमाईची भूमिका घेणाऱ्या मुंबई महापालिकेला हायकोर्टानं काल फटकारलं. अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम वाचवण्यासाठी राणे यांच्या कंपनीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका गुणवत्तेच्या आधारावर नसल्याचं सांगत हायकोर्टानं २२ जून रोजी ती फेटाळली होती. त्यानंतर महापालिकेकडे नव्यानं अर्ज करून राणेंच्या कंपनीनं हायकोर्टात पुन्हा याचिका दाखल केली. त्यावर राणेंच्या अर्जाचा विचार केला जाऊ शकतो अशी भूमिका महापालिकेच्या वकिलांनी कोर्टात मांडली. पालिकेच्या या बदललेल्या भूमिकेवर न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला. १०० मजली बेकायदा इमारतही तुम्ही अधिकृत करणार का असा सवाल हायकोर्टानं यावेळी विचारला. राणेंचं बांधकाम नियमित करण्यामागे पालिकेचा हेतू काय असा सवाल हायकोर्टानं विचारला. कोर्टानं यावरचा निकाल राखून ठेवलाय.




















