Bappa making from Vegetarian Fish feed : शाकाहारी माशांच्या खाद्यापासून साकारला बाप्पा
सध्या गणपती बाप्पाचा उत्सव सध्या जल्लोषात सर्वत्र सुरुय. सगळीकडे चैतन्याचं वातावरण पसरलंय. मुंबईतील साकीनाका मोहाली व्हिलेज येथील श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेले सहा वर्षे पूर्णपणे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करतंय. मुंबईचा महाराजाधिराज म्हणून प्रसिद्ध असलेली इथल्या गणपतीची भव्य मूर्ती पूर्णपणे पर्यावरण पूरक असते. कधी कागदाची कधी धान्याची तर कधी तुरटीची मूर्ती विराजमान करणाऱ्या या मंडळाने यंदाच्या वर्षी चक्क शाकाहारी माश्याचा खाद्य पासून तयार केलेली गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. ही मूर्ती मुंबई उपनगरातील मुख्य असलेल्या पवई तलावात विसर्जन करण्यात येणार आहे. या मुळे इथल्या जैवविविधतेला ही त्रास न होता फायदाच होईल असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. याचसंदर्भात मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश खानविलकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी.