Baba Siddique Firing : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर 3 जणांकडून गोळीबार
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाब सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली असून बाबा सिद्दिकी यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बाबा सिद्दिकी हे राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला रामराम करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तर त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व या मतदारसंघाचे आमदार आहेत.
झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडल्याची माहिती आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
बाबा सिद्दिकी यांच्यावर कोणी गोळीबार केला याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.