Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामधील अपघातानंतर राजकीय ओरोप-प्रत्यारोपांचं सत्र
मुंबईत कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये काल रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली.. यात ७ जणांचा मृत्यू झालाय तर ४८ जण जखमी झालेत. यानिमित्तानं नेमक जबाबदार कोण, ड्रायव्हर की बेस्ट प्रशासन असा प्रश्न उपस्थित झालाय. आरोपी बसचालक संजय मोरे हा आधी कंत्राटी पद्धतीनं बेस्टमध्येच काम करायचा...त्याला १० दिवसांपूर्वी पुन्हा कंत्राटी पद्धतीनं बेस्टच्या इलेक्ट्रिक बसवर ड्रायव्हर म्हणून घेण्यात आलं. पण त्यासाठी त्याला केवळ तीन दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं. एवढं प्रशिक्षण पुरेसं आहे का, असा प्रश्न उपस्थित झालाय. दुसरीकडे कंत्राटी भरतीला भाजपचा विरोध होता, पण आदित्य ठाकरेंच्या दबावामुळे बेस्टमध्ये कंत्राटी भरती सुरू झाल्याचा आरोप भाजपनं केलाय.
जबाबदार कोण? ड्रायव्हर की 'बेस्ट'?
- खासगी बसचालक संजय मोरे दहा दिवसांपूर्वी कंत्राटी पद्धतीने रुजू
- १ डिसेंबर रोजी नियुक्ती आणि नवीकोरी इलेक्ट्रिक बस हातात
- संजय मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नाही
- फक्त ३ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर १२ मीटर लांब इलेक्ट्रीक बस चालवण्याची जबाबदारी
- संजय मोरेला मोठी बस चालवण्याचा अनुभव नव्हता
- मोरेला लहान आकाराच्या आणि बेस्टच्या जुन्या बस चालवण्याचा सराव
- जुन्या बसमध्ये पॉवर स्टेअरिंग ही संकल्पना नव्हती
- संजय मोरेला चालवण्यासाठी दिलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये पॉवर स्टेअरिंग
- पॉवर स्टेअरिंगचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याची शक्यता