MNS Shivsena | मनसेसोबत युती करायची का नाही? उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना प्रश्न
उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवास्थानी माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. मनसेशी युती केली तर फायदाच होईल असा सूर माजी नगरसेवकांनी आळवला. उद्धव ठाकरेंनी म्हटले, 'ज्या कुणासोबत युती करायची असेल ती निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच केली जाईल.' उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका मांडल्यानं आता निर्णयाचा चेंडू राज ठाकरेंच्या खोलत्यांत ढकलण्यात आला आहे.
मनसेसोबत युती करायची की नाही हा प्रश्न आज विचारला दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंनी. निमित्त होतं ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीचं। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवास्थानी माजी नगरसेवकांची बैठक पार पडली। यावेळी मनसेशी युती करण्यासंदर्भात चर्चा झाली। मनसेशी युती केली तर फायदाच होईल असा सूर माजी नगरसेवकांनी आळवला। दरम्यान ज्या कुणासोबत युती करायची असेल ती निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच केली जाईल अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली आहे। दरम्यान मनसेशी युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका मांडल्यानं आता निर्णयाचा चेंडू पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या खोलत्यांत ढकलण्यात आला। तसंच युतीसाठी स्पष्ट भूमिका मांडण्याबाबत मनसेवर दबाव वाढविण्याची खेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून खेळली जातेय का असाही सूर अशीही चर्चा सध्या सुरू झाली आहे।























