Zero Hour : बदलापूर वेदनादायी घटनेतही राजकारणाचा शिरकाव,विरोधकांचा आक्रोश,सत्ताधाऱ्यांचं प्रत्युत्तर
Zero Hour : बदलापूर वेदनादायी घटनेतही राजकारणाचा शिरकाव,विरोधकांचा आक्रोश,सत्ताधाऱ्यांचं प्रत्युत्तर
बदलापूरमधील शाळेत २ चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला.. त्याचे पडसाद काल राज्यभरातच नाही तर देशभरात उमटले.. कालच्या उद्रेकावरुन राज्यात राजकारण जोरात सुरु झालंय.. त्याबाबत सविस्तर जाणून घेण्याआधी आजची सर्वात मोठी अपडेट पाहुयात.. बदलापूरच्या अभयांचा गुन्हेगार- आरोपी अक्षय शिंदेला आज सकाळी कल्याण कोर्टात व्हीसी द्वारे हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .. या नराधमाचं वकीलपत्र घेण्यास कल्याणमधील वकिलांनी नकार दिलाय हे विशेष. आरोपी राहात असलेल्या खरवई गावातही संतप्त नागरिकांनी काल त्याच्या घराची तोडफोड केल्याचं समोर आलं.. दरम्यान स्पेशल SIT टीमच्या प्रमुख आरती सिंग यांनी अज्ञात ठिकाणी पिडित मुलींचा जबाब नोंदवला, पिडित मुलीची आई आणि आजोबा यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला.
न्याय व्यवस्था आपल्या गतीने आपलं काम करेलच.. पण राज्यात विधानसभा निवडणुकांचं वातावरण आहे.. त्यामुळे आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं की बदलापूरची घटना अतिशय वेदनादायी आहे, तो एक क्रुर गुन्हा आहे... त्यात जातपातधर्म, राजकारण आणू नका.. मात्र ते शब्द हवेत विरायचा आतच दोन्ही बाजुंनी राजकारण सुरु झालेलं पाहायला मिळालं.. कालच सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला.. तर रेल्वे ट्रॅक रोखून धरणाऱ्यांमध्ये स्थानिक नव्हते अशी भूमिका सरकारने घेतली होती.. बदलापुरच्या आंदोलनाला नेतृत्व नव्हते पण याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतल्याचा मोठा दावा पोलिसांनी केला आहे. बदलापूर पोलिसांनी फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंगच्या आधारे ६८ जणांना अटक केली आहे..