City Co-Operative Bank Scam: नेमका सिटी बॅंक घोटाळा काय आहे? Adsul पिता पुत्रांवर नेमके कुठले आरोप?
मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Shiv Sena Ex MP Anandrao Adsul) यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. मात्र अडसूळ दिल्लीला जाणार असल्यानं हजर राहाणार नाहीत अशी माहिती त्यांनी दिली आहे. City Co-Op बँकेतल्या कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची याआधीही चौकशी करण्यात आली होती. नवनीत राणांच्या तारखेवेळी नेहमीच समन्स पाठवलं जातं असा आरोप आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी केला आहे. आम्ही सर्व चौकशीला जायला तयार, पण नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाच्या केसचा निकालही निपक्षपाती व्हायला हवा, अशी मागणीही अभिजीत अडसूळ यांनी केली.






















