Vishal Patil on Shiv Sena : महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उमेदवाराच्या पाठिशी विशाल पाटलांचा हात
Vishal Patil on Shiv Sena : महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उमेदवाराच्या पाठिशी विशाल पाटलांचा हात
कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरला जाणारी रेल्वे ही आतापर्यंत दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आटपाडी मधून जावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांनी।म्हटलेय. त्याचवेळी शिंदे गटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना विधानसभेसाठी ऑफर देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उमे राहणार असल्याचे स्पष्ट केले. रेल्वे आणि विधानसभेच्या अनुषंगाने खासदार विशाल पाटील यांचे वक्तव्य मतदारसंघात चर्चेचा मुद्दा बनला. आटपाडी बाजार समितीत आयोजित कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते.
आटपाडीसाठी केंद्रातून वेगळे काहीतरी आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडीमार्गे जाईल, यासाठी आपण प्रयत्न करत आहेत..तसेच आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा खेळ सुरू होईल. या निवडणुकीत लाखोंने मते सुहास बाबर यांना मिळावेत, ही आमची अपेक्षा आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही शब्द सोडवुन आलेलो आहे. जिथे आमच्यावर प्रेम आहे तेथे आम्ही प्रेम देतो. आम्ही ताकदीने तुमच्या पाठीशी ठाम राहणार आहोत अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी सुहास बाबर यांना दिला. तुम्ही विधानसभेसाठी आमच्याकडुन उभे रहावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण, आमचे मित्र खासदार
श्रीकांत शिदि ऐकायला तयार नाहीत, सांगुन विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना पाठबळ देण्याची ग्वाहीही खासदार विशाल पाटील यांनी जाहीर व्यासपीठावरून दिली.
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8707373714b68ffdd9e66658c40ccdfb1739694324067976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)