Jayant Pawar Death : ज्येष्ठ पत्रकार, लेखक, नाटककार जयंत पवार यांचं निधन, साहित्य क्षेत्रावर शोककळा
मुंबईः ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार (Marathi Writer Jayant Parwar) यांचं निधन झालं आहे. जयंत पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते.
पवार यांनी लिहिलेल्या नाटकांनी तसेच कथांनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला आहे. पवार यांचा फीनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथासंग्रहाला साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावर ‘लालबाग परळ’ हा मराठी चित्रपट बनला आहे. तसेच ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’ या कथेवर ‘रज्जो’ हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला आहे.





















