Vadgaon Sheri Mahayuti : सुनिल टिंगरे यांना महायुती धर्म पाळण्याचा विसर पडला - जगदीश मुळीक
Vadgaon Sheri Mahayuti : सुनिल टिंगरे यांना महायुती धर्म पाळण्याचा विसर पडला - जगदीश मुळीक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याची भाजपचे वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचे ट्विट
तीनशे कोटींच्या विकास कामांच भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत असतानाच त्याच्या आदल्या दिवशी जगदीश मुळीक यांनी ट्विट करत तीनशे कोटींची विकास कामे केवळ टिंगरे यांच्या प्रयत्नातून झाली नसून महायुतीतील इतर घटक पक्षांचा देखील त्यात हातभार असल्याचा उल्लेख केला आहे
टिंगरे यांना महायुतीचा विसर पडला असून महायुती म्हणत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावणे टिंगरे कसे काय विसरले असे देखील द्वारे सवाल
जगदीश मुळीक ट्विट -
वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का?
महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे !
वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. पण या विकासकामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे, हे आमदार जाणीपूर्वक विसरत आहेत !
तीनशे कोटींच्या विकासकामांचा निधी मिळतो, तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचंही योगदान आहे, पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचे सौजन्यही आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाही.