Udayanraje Bhosale Speech :अतुलबाबा बच्चू म्हणतात..बच्चू-बच्चूकरुन बाजूला नका करु सत्यजीतला!
Udayanraje Bhosale on Satyajit Patankar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनीच भाजपने खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा दिलाय. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील शरद पवार गटाचे नेते सत्यजीत पाटणकर (Satyajit Patankar) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बच्चू, बच्चू म्हणून डच्चू देऊन बाजूला सारू नका म्हणजे झालं, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सत्यजीत पाटणकर यांच्या पक्ष प्रवेशावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की,पाटणकर यांचा आज प्रवेश होतोय, त्यांचे पक्षात स्वागत. अनेक वर्षापासून सत्तेचे केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळालं. बोलणं सोपं असतं, आचरणात आणणं कठीण असतं. पहिले लोकं दगडाला शेंदूर लावला की निवडून द्यायचे. मात्र आता तशी परिस्थिती उरलेली नाही. बालेकिल्ला म्हणत लोकांना, विकास कामांना वंचित ठेवलं, असे म्हणत त्यांनी खासदार शरद पवारांवर निशाणा साधला. मात्र आपल्या जिल्ह्याला न्याय देण्याचा खरा प्रयत्न कोणी केला असेल तर भाजपने केला. भाजप हा पक्ष नाही तर कुटुंब आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही हे करू ते करू आणि निवडणुका संपल्या की लोकं विसरतात. पाटणकर हे माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा आता कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. हा फक्त भाजपचा किल्ला झाला आहे, असा टोला त्यांनी यावेळी शरद पवारांना लगावला. तर हा प्रवेश मागेच होणार होता, त्या भागातील लोकांचा छळ होतं होता, कामं होत नव्हती, त्यानंतर आज हा निर्णय झाल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.























