Uttar Pradesh News: देणगी गोळा करून नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशीबच चमकलं! सापडले मौल्यवान सोन्याचे नाणे; गावात एकच खळबळ
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमध्ये अलिगड जिल्ह्यातील एका गावात ड्रेनेजची पाईटपलाईन काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये तब्बल 11 सोन्याची नाणी सापडली आहेत.

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमध्ये अलिगड जिल्ह्यातील एका गावातून आलेल्या एका बातमीची चांगलीच चर्चा सध्या रंगू लागली आहे. यात ड्रेनेजची पाईटपलाईन काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये तब्बल 11 सोन्याची नाणी सापडली आहेत. यामुळे संपूर्ण गावात एकाच खळबळ उडाली आहे. दरम्यान या खजाना पाण्यासाठी आणि नाणे घेण्यासाठी आत या परिसरात स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, गावातील स्थानिक रहिवासी पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम करत होते. गावकऱ्यांनी देणग्या गोळा केल्या आणि खोदकाम सुरू केले. यावेळी अचानक, खोदकाम करताना मातीखालून चमकदार धातूच्या वस्तू बाहेर आल्या. स्थानिकांनी अधिक निरखून पाहिल्यास ते सोन्याची नाणे असल्याचे बोलले जात आहे. तर अनेकांनी असा दावा केला आहे की घटनास्थळावरून लोकांनी आणखी नाणी उचलली आणि त्यांच्या घरी नेली.
नाला बांधण्यासाठी देणगी गोळा केली, उत्खननात 'खजिना' सापडला
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अलिगढमधील एका गावातील आहे. जिथे स्थानिक लोकांनी एकत्र देणग्या गोळा केल्या होत्या. जेणेकरून पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपलाईन टाकता येईल. उत्खनन सुरू झाल्यावर खड्डा खोदताना अचानक चमकदार धातूची नाणी दिसली. गावातील जमीर नावाच्या व्यक्तीने सांगितले की, आम्ही 5-6 घरातील लोकांनी मिळून हे काम सुरू केले होते. खड्डा खोदताच आम्हाला प्रथम 11 सोन्याची नाणी सापडली. त्यानंतर गावकऱ्यांची गर्दी जमली आणि लोकांनी स्वतःच खोदण्यास सुरुवात केली.
गोंधळात ज्याला नाणी सापडली ते ती घेऊन पळून गेले
उत्खनन दरम्यान नाणी सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी फावडे, बांबू आणि हातांनी खोदकाम सुरू केले. ज्याला कुठेही आणि कितीही नाणी सापडली, तो ती घेऊन पळून गेला. फैजान नावाच्या एका तरुणाने सांगितले की काही लोकांनी ती नाणी तिथेच लपवून ठेवली.
पोलिसांनी कारवाई केली, काही नाणी जप्त
घटनेची माहिती मिळताच क्वार्सी पोलीस ठाण्याचे एसएचओ त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर घेराव घातला आणि लोकांकडून जप्त केलेली 11 नाणी सील केली आणि ती पोलिस ठाण्यात जमा केली. तथापि, गावात अशी चर्चा आहे की लोकांनी अनेक नाणी लपवून ठेवली आहेत आणि ती पोलिसांच्या ताब्यात दिली नाहीत. एसएचओने इशारा दिला आहे की जो कोणी त्यांच्याकडे नाणी ठेवत असेल त्याने स्वतः येऊन ती पोलिस ठाण्यात जमा करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
अधिक वाचा























