Top 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp Majha
अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरात घुसून चाकूहल्ला, लिलावतीमध्ये सर्जरीनंतर पाठीत रुतलेलं तीक्ष्ण शस्त्र काढण्यात डॉक्टरांना यश
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफवर दोन शस्त्रक्रिया, पाठीच्या कण्याला गंभीर जखम मात्र प्रकृती स्थिर, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती, उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता...
शेजारील इमारतीमधून उडी मारून हल्लेखोरानं एन्ट्री केल्याचा संशय, सीसीटीव्हीत हालाचाली चित्रित झाल्याची सूत्रांची माहिती
सैफच्या हल्ल्यानंतर क्राईम ब्रँच सक्रिय, फोरेन्सिककडून सर्व लहान-सहान पुराव्यांची पडताळणी, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकही हल्लेखोराच्या तपासात अॅक्टिव
सीसीटीव्ही फूटेजच्या पडताळणीत पोलिसांना आढळले दोन संशयित, दोन संशयितापैकी एक हल्लेखोर असण्याची शक्यता, दोन्ही संशयिताचा शोध युद्धपातळीवर
सैफवर हल्ला, विरोधकाचं कायदा-सुव्यवस्थेवर बोट! सिद्दीकींच्या हत्येनंतरही सरकारला सेलिब्रिटींच्या सुरक्षेचं गांभीर्य नसल्याचा शरद पवारांचा आरोप
हल्ल्यात जखमी अभिनेत्याचं नाव खान असल्यामुळेच विरोधकांकडून राजकारण, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गंभीर आरोप, सेलिब्रिटींसाठी मुंबई आजही सुरक्षित असल्याचा दावा
विधान परिषद आमदार अपात्रतेची आजची सुनावणी संपली, पुढील सुनावणी दोन महिन्यांनंतर, नव्या सभापतींच्या सुनावणीचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून स्वागत