Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट: 19 June 2024 : 4.30 pm ABP Majha
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट: 19 June 2024 : 5 pm ABP Majha
विधानसभेच्या १२७ जागा लढवण्याची मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तयारी, जरांगे पाटलांकडून विधानसभेच्या १२७ जागांवर सर्व्हे, एबीपी माझाला जरांगेंची माहिती.
मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर विधानसभेला १२७ उमेदवार उभे करणार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा.
मनोज जरांगे पाटील स्वतः निवडणूक लढवणार नाही, स्वतः पक्ष काढणार का यावर अद्याप निर्णय झाला नसल्याची जरांगेची माहिती, वेळ पडल्यास मराठा, मुस्लिम, दलितांची मोट बांधणार, जरांगेंची प्रतिक्रिया.
राज्यातील मराठाबहुल भागांचा सर्व्हे पूर्ण, ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर विधानसभा लढवणार, मनोज जरांगे पाटलांची घोषणा, राजकारणात जायचं नाही, पण आरक्षण न दिल्यास नाईलाज असेल, जरांगेंची प्रतिक्रिया.
निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार, मनोज जरांगेंच्या घोषणेनंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया, तर मराठ्यांना १० टक्के आरक्षण सरकारनं दिलंय, त्यामुळे ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी चुकीची, शेंडगेंचं वक्तव्य.