एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई (Mumbai) आर्थिक राजधानी आहे. पण मुंबई देशाचं पवार हाऊस झालं पाहिजे, त्यासाठी मुंबई पालिकेत महायुतीचेच सरकार असणं आवश्यक असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केले.

Eknath Shinde : मुंबई (Mumbai) आर्थिक राजधानी आहे. पण मुंबई देशाचं पवार हाऊस झालं पाहिजे, त्यासाठी मुंबई पालिकेत सुद्धा महायुतीचेच सरकार असणं आवश्यक असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केले. त्या तयारीसाठी नगरसेवक, आमदार, खासदार यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी बैठक घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  

विधानसभेच्या निवडणुकीत कामाची पोचपावती मिळाली

विधानसभेच्या निवडणुकीत कामाची पोचपावती मिळाली आहे. त्या काम लोक लक्षात ठेऊन पालिकेतसुद्धा महायुतीला विजय मिळेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. महायुती म्हणून 227 वॉर्डमध्ये आम्ही तयारी करणार आहोत असेही ते म्हणाले. मुंबई मध्ये आताच झालेल्या निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाला त्या निमित्ताने कार्यकर्त्यांचे अभिनंदन केलं शुभेच्छा दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  

मुंबई महापालिका निवडणूक महायुती जिंकेल

मुंबई महापालिका निवडणूक महायुती जिंकेल असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आण्ही तयारीला सुरुवात केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईत अडीच वर्षात मोठं काम केलं आहे. यामध्ये खड्डेमुक्त मुंबई, आरोग्य असे सगळं डीप क्लीन ड्राईव्ह, बाळासाहेब दवाखाना, पालिकेत सुरू केलेल्या योजना असेही एकनाथ शिंदे म्हणाले. बंद पडलेले प्रकल्प सुरू करणं, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जी काम झाली नाहीत ती अडीच वर्षात आम्ही निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. महालक्ष्मी रेसकोर्सवर सेंट्रल पार्क करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.  

मुंबईच्या विकास हा आमचा अजेंडा 

मुंबईच्या विकास हा आमचा अजेंडा आहे. मुंबईतील खड्ड्यांचा प्रवास टाळण्यासाठी दोन फेजमध्ये आम्ही निर्णय घेतले. यामध्ये मेट्रोची, कोस्टल, अटल सेतू ही काम लोक पाहत आहेत. सुरक्षित मुंबई महिलांना द्यायची आहे. त्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलं आहे की, मुंबईला आर्थिक कमतरता भासणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. ते लोक लोकसभेच्या निवडणूक झाल्या की हुरळून गेले, त्यांनी विधानसभेचे मंत्रीमंडळ सुद्धा तयार केलं होतं असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

आमच्या युतीत  वैचारिक भूमिका एक 

आमच्या युतीत  वैचारिक भूमिका एक आहेत. 2022 मध्ये आम्ही निर्णय घेतला आणि सर्व सामान्यांच्या सरकार आल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  काही जागा आमच्या किरकोळ फरकाने पडल्या. जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला त्याला मुंबईत आणण्याचं काम आपलं सरकार करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!Special Report Gold Silver Rate : तोळा होणार लाख मोलाचा, सोनं आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांकSpecial Report Halal Vs Zatka : हलालविरुद्ध झटका, मल्हार सर्टिफिकेटला हिंदू खाटिकांचाच विरोधSpecial Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Embed widget