Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 30 August 2024 : ABP Majha
झेड प्लस सुरक्षेसंदर्भात शरद पवारांच्या घरी बैठक, शरद पवारांनी अंशतः सुरक्षा नाकारल्याची माहिती, शरद पवारांच्या अटी-शर्तींबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर करणार. अंतिम निर्णय अजून नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उद्यापासून तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक, केरळच्या पलक्कडमध्ये बैठकीचे आयोजन.
गोकुळ दूध संघाची 62 वी सर्वसाधारण सभा गोंधळात सुरु. सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांसमोर घोषणाबाजी. दूध संघाच्या अध्यक्षांनी गोंधळातच सभा चालवली.
बदलापूरच्या घटनेनंतर पुणे पोलीस अॅक्शनमध्ये, शाळा परिसरातल्या पानटपऱ्या हलवणार, शाळेच्या १०० मीटर परिसरात सिगारेट, गुटखा,अंमली पदार्थ विक्री रोखणार
नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला मुलीच्या आईनं दिला चोप, चार संशयित पोलिसांच्या ताब्यात, नाशिकच्या सिडको परिसरातील घटना.
धावत्या ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशाला पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान, मुंबईच्या गोरेगाव रेल्वे स्टेशनवरील घटना, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद.
गुजरातच्या कच्छ-सौराष्ट्रमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा, सौराष्ट्रातील चार जिल्ह्यांत आज ऑरेंज अलर्ट.