TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04 PM : 12 June 2024 : ABP Majha
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधताना रावसाहेब दानवेंनी गंभीर आरोप केलाय. सिल्लोडचा पाकिस्तान होत चाललाय अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी टीकास्त्र डागलंय. खरं तर लोकसभा निवडणुकीत जालन्याचे महायुतीचे उमेदवार म्हणून रावसाहेब दानवेंना अब्दुल सत्तार यांच्याकडून सहकार्य अपेक्षित होतं. मात्र माझ्यामुळेच रावसाहेब दानवेंचा पराभव झाला असा सूर सत्तार आळवत असल्याचं जालन्याचे भाजपचे माझी खासदार म्हणताहेत. रावसाहेब दानवेंनी माझा कट्ट्यावर वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या हटके शैलीत भाष्य केलं. मात्र सत्तारांविरोधात त्यांच्या मनातली खदखद बाहेर पडली. सिल्लोडमध्ये जमिनी हडपल्या जात असल्याचा आरोपही दानवेंनी केलाय. आता सत्तार दानवेंच्या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे
उद्धव ठाकरे यांनी घेतली संपर्कप्रमुखांची बैठक. २५० संपर्कप्रमुख बैठकीला होते उपस्थित. बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निहाय माहिती संपर्कप्रमुखांकडून घेतली.
पंचवीस वर्षांपूर्वीची जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होणारी शिवसेना आता भाजप आणि विरोधकांना दाखवा, आणि विधानसभेच्या तयारीला लागा. बैठकीत उद्धव ठाकरे यांची संपर्कप्रमुखांना सूचना.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला खासदार संजय जाधव यांचा पाठिंबा. मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या तात्काळ मान्य करा, ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांचं राज्यपालांना पत्र.
धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मागणीचा विचार झाला नाही तर आंदोलकांचा उड्या मारून आत्मदहनाचा इशारा. आंदोलन स्थळी ॲम्बुलन्स आणि अग्निशमनच्या गाड्या दाखल.
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8707373714b68ffdd9e66658c40ccdfb1739694324067976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 16 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/53668dffb85b3742c672a1eda65b78521739693655706976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)