(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 20 August 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 20 August 2024 : ABP Majha
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीमध्ये पार पडली बैठक. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती.
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन सुरु असलेल्या चर्चांना तुर्तास विराम, नवीन अध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये, तर जानेवारी 2025मध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदभार स्विकारणार असल्याची माहिती.
रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील भाजपचे राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार. भाजपनं जाहीर केली राज्यसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा.
मविआच्या जागावाटपाच्या चर्चेला उद्यापासून सुरुवात, मविआच्या समन्वय समितीची उद्या पहिली बैठक, मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे पहिल्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता.
ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याबाबत मविआतील वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह केला जाणार, सूत्रांची माहिती, उद्याच्या मविआच्या बैठकीत देखील हा मुद्दा चर्चिला जाणार असल्याची माहिती.
रवि लांडगेंनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भोसरीच्या जागेवरुन मविआत वादाची शक्यता, शरद पवार गटात गेलेले अजित गव्हाणेही भोसरीतून लढण्यास इच्छूक.
काँग्रेसची छाननी समिती महाराष्ट्राचा दौरा करणार, २७, २८ आणि २९ ऑगस्टला विधानसभेसाठी इच्छुकांची घेणार भेट, प्रामाणिक उमेदवाराला तिकीट देण्याच्या राहुल गांधींच्या सूचना.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते उत्तर महाराष्ट्रात, 22 ऑगस्टला धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील मतदारसंघांचा, तर २३ ऑगस्टला नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार.
राष्ट्रवादी राज्यसभेसाठी नितीन पाटील यांना उमेदवारी देणार असल्याचं जवळपास निश्चित, नितीन पाटील वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ.