(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 30 July 2024
नाशिक शहर बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. शहर बस सेवा तीन दिवसानंतर पुन्हा सुरळीत. पाच हजार रुपये पगार वाढ, एक रुपया प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह वाढवण्याचा प्रशासनाचा निर्णय.
हिंगणघाटमधील दिव्यांगांना म्हाडाची घरे द्या, सामाजिक कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधवांनी केली मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन तर पेन्शनमध्येही वाढ करण्याची मागणी.
अमरावतीत राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचे अमरावती आगारात घंटानाद आंदोलन. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन.
बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन, गेल्या वर्षीचा पीकविमा आणि नुकसाना भरपाई मिळावी,यासह विविध मागण्यांसाठी तहसीलवर मोर्चा.
नांदेड जिल्ह्यातील तामसा शहर कडकडीत बंद, मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी.
अहमदनगर शहरातील विजेच्या लपंडावाविरोधात ठाकरे गटाच्या वतीनं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. महावितरणच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलनाचा इशारा.