ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
WTC : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये कसोटी सामना सुरु आहे. त्याचवेळी सर्वांच्या नजरा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे लागलं आहे.
मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथी कसोटी सुरु आहे. मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या मालिकेत 1-1 अशा बरोबरीत आहेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकानं रोमांचक लढतीत पाकिस्तानला 2 विकेटनं पराभूत करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी संघर्षाची स्थिती आहे. त्याचवेळी मेलबर्न कसोटी आणि सिडनी कसोटीच्या निकालावर भारताचं भवितव्य अवलंबून आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर वेगवेगळी समीकरणं समोर येत आहेत. त्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ बाहेर जात तिसराच संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो.
कोणतं समीकरण आणि कोणता संघ WTC फायनलमध्ये जाणार?
सध्या सुरु असलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचा निकाल जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अतिम फेरीत दक्षिण आफ्रिके विरुद्ध कोण लढणार हे निश्चित होऊ शकतं. मात्र, त्यापूर्वी असं समीकरण समोर येत आहे. ज्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ स्पर्धेबाहेर जातील. तिसराच संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्या संघाचं नाव श्रीलंका असं आहे.
श्रीलंकेला कशी संधी मिळणार?
श्रीलंकेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचायचं असल्यास पहिल्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेली बॉर्डर गावसकर ट्रॉफी बरोबरीत सुटली पाहिजे. त्यामुळं मेलबर्न कसोटी आणि सिडनी कसोटी अनिर्णित राहणं आवश्यक आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी बरोबरीत सुटली आणि श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवल्यास त्यांना जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्देच्या अंतिम फेरीत प्रवेश होऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकेचं स्थान पक्कं
दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानला 2 विकेटनं पराभूत करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
मेलबर्न कसोटीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे सुरु असलेल्या कसोटीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात 9 बाद 228 धावा केल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे 333 धावांची आघाडी आहे. पाचव्या दिवशी 98 ओव्हर्सचा खेळ होणार असल्यानं मॅचच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
इतर बातम्या :