मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मुंबईच्या मालाडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या मालाड मालवणीमध्ये मदरसात शिकणाऱ्या एका 11 वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडलीय.
Child Suicide In Mumbai : मुंबईच्या मालाडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या मालाडमधील मालवणीमध्ये मदरशात शिकणाऱ्या एका 11 वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडलीय. 11 वर्षीय मुलगा आपल्या मोठा भावासोबत मदरसामध्ये शिकत होता. काल संध्याकाळी मदरसामध्ये असलेल्या बाथरुमचे गेट बंद करुन, त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह शताब्दी रुग्णालयामध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. दरम्यान,11 वर्षीय मुलाच्या आत्महत्या प्रकरणी मालवणी पोलिसांनी ADR दाखल केली आहे. मदरसामध्ये मुलांना शिकवणारे मौलानाने मुलासोबत मारहाण केली का? मुलांनी अशा पद्धतीचे टोकाची भूमिका का घेतली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात अधिक तपास मालवणी पोलीस करत आहे.
11 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ
दरम्यान, या लहान असणाऱ्या 11 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. एवढ्या कमी वयाच्या मुलानं नेमकी आत्महत्या का केली असावी? असे सवाल देखील उपस्थित केले जात आहे. तसेच अनेकांकडून तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी शताब्दी रुग्णालयामध्ये पाठवला आहे. अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. मुलाने नेमके असे टोकाचे पाऊल का उचलेले आहे? त्याच्यावर काही दबाव होता का? याबाबतचा तपास देखील पोलीस अधिकारी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: